Jackie Loves Zumba असे म्हणत एका जाहिरातीसाठी जॅकी श्रॉफ थिरकले झुम्बावर, व्हायरल व्हिडिओ पाहून Anil Kapoor ने दिली ही मजेशीर प्रतिक्रिया
Jackie Shroff Zumba Video (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडमध्ये कधी 'भिडू' असा आवाज ऐकला तर एकच नाव डोळ्यांसमोर येते ते म्हणजे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackir Shroff)... अत्यंत हसरे, मिश्किल, दिलदार मनाचा असा हा अभिनेता. अभिनयाच्या बाबतीत अव्वल असलेला हा अभिनेता डान्सच्या बाबतीत थोडासा मागेच आहे असे अनेकदा प्रेक्षकांकडून ऐकायला मिळालय. पण हाच अभिनेता झुम्बा करतोय असे म्हटलं तर? कुणाचा विश्वास बसणार नाही. ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ एका जाहिरातीसाठी झुम्बा (Zumba) करतानाचा एक व्हिडिओ त्यांनीच आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. तर त्यांचे जवळचे आणि खास मित्र अनिल कपूरने देखील हा व्हिडिओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ यांनी हिरव्या रंगाचे जॅकेट घातले असून डोक्याला लाल पट्टी आणि डोळ्यांना काळा चष्मा लावला आहे. यात ते खूपच कुल आणि स्टायलिश दिसत आहेत. त्यांच्यामागे काही बॅकडान्सर्स असून ते त्यांच्यासोबत झुम्बा करताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Sooryavanshi: रोहित शेट्टीने अक्षय कुमारचा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत करुन पुढे ढकलला

पाहा व्हिडिओ

या व्हिडिओला 'अतिरिक्त झुम्बा' असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडिओ पाहून त्यांचे मित्र अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी "तुम्ही हे ऑडिशनदरम्यान कसं काय केलं?" असा मिश्किल सवाल विचारला आहे.

जॅकी श्रॉफ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ‘राधे’ या चित्रपटात ते सलमान खानसोबत दिसणार आहेत, तर ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात ते अक्षय कुमारसोबत दिसतील. सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतही ते एका चित्रपटात दिसणार आहेत.