 
                                                                 Saif Ali Khan Attack Case: गुरुवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबई पोलिस (Mumbai Police) या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे. अभिनेत्यावर करण्यात आलेल्या तपासाला आता वेग आला आहे. कारण, मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात द फ्री प्रेस जर्नलने वृत्त प्रकाशित केलं आहे. सध्या या संशयिताची चौकशी सुरू आहे.
संशयिताची चौकशी सुरू -
संशयित हा खरा हल्लेखोर आहे की नाही किंवा गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 15 ते 16 जानेवारी दरम्यान मध्यरात्री सैफ अली खानवर वांद्रे येथील त्याच्या घरात चाकूहल्ला करण्यात आला. हल्लेखोराने अभिनेत्यावर सहा वेळा चाकूहल्ला केला. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक पथक तयार केले आहेत. मात्र, अद्याप आरोपी फरार आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. परंतु, तो हल्लेखोर नसल्याचे उघड झाले आहे. (हेही वाचा -Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताचा नवीन फोटो आला समोर; ओळख लपवण्यासाठी बदलले कपडे)
प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोर सैफच्या वांद्रे येथील घरात घुसला. आरोपी सैफच्या मुलाच्या बेडरूममधून घरात घुसला. त्यानंतर त्याने मोलकरणीकडून पैशांटी मागणी केली. त्यानंतर आरडोओरडा ऐकून सैफ घटनास्थळी पोहोचला. यानंतर हल्लेखोराने सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यात अभिनेत्याला गंभीर दुखापत केली. नंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. (हेही वाचा -Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील)
दरम्यान, हल्लेखोर पळून जाताना अभिनेत्याच्या इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. सैफचा मुलगा इब्राहिम अली खानने जखमी सैफला लीलावती रुग्णालयात नेले. तथापी, दादरमधील एका मोबाईल अॅक्सेसरीजच्या दुकानात संशयिताचा व्हिडिओ समोर आला आहे. वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, सैफवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर दुकानात गेला होता. तो हेडफोन खरेदी करत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरसह 30 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
