Bharti & Haarsh Drugs Case: ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणीत वाढ; NCB ने न्यायालयात दाखल केले 200 पानी आरोपपत्र
Bharti & Haarsh (PC - Facebook)

Bharti & Haarsh Drugs Case: आपल्या उत्तम कॉमेडीने सर्वांची मने जिंकणारी कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiya) पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतात. ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबीने भारती आणि हर्षविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत हर्ष आणि भारतीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तरीही या जोडप्याचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई एनसीबीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्याविरोधात कोर्टात 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात दाम्पत्याच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित संपूर्ण तपशील आहेत. 2020 मध्ये या दाम्पत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती, पण लवकरच त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, आता या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. (हेही वाचा - Pehli Barsaat Song: शिविन नारंग आणि करिश्मा शर्माचे गाणे अखेर रिलीज, जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री आली दिसून, पाहा व्हिडीओ)

काय होते संपूर्ण प्रकरण?

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीने ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक केली होती. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापे मारताना 86.50 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याचवेळी, चौकशीदरम्यान या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचीही कबुली दिली होती.