सुशांत सिंह राजपूत मृत्यूबाबतची वक्तव्ये, बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणावर केलेले भाष्य, त्यानंतर मुंबई महापालिकेसोबत वाद, अशा अनेक कारणांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आता कंगना एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशिष्ट समुदायाविरूद्ध 'द्वेषपूर्ण' आणि 'अपमानजनक' पोस्ट केल्याप्रकरणी, कोर्टाने मुंबई पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी कंगना व रंगोली यांच्या विरोधात दाखल असलेल्या देशद्रोहाच्या (Sedition) गुन्ह्याबाबत त्यांना समन्स बजावला होता.
मुनव्वर अली सय्यद उर्फ साहिल नावाच्या व्यक्तीने वांद्रेच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली असून, असा आरोप केला आहे की ज्या प्रकारे कंगना आणि रंगोली हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकारांबद्दल मुलाखती देत आहेत आणि ट्विट करत आहेत, यामुळे बर्याच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्यावर कोर्टाने सुरुवातीला हे आरोप योग्य दिसत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. यासह अंधेरी कोर्टात वकील अली कासिफ खान देशमुख यांनी कंगना रनौत हिच्यावर राजद्रोह आणि तिने केलेल्या ट्विटमधून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा आरोप लगावला आहे. (हेही वाचा: कंगना रनौत हिच्याकडून हिंदु-मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण करण्यासह महापालिकेला 'पप्पू सेना' म्हणत चेष्टा, अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात गुन्हा दाखल)
पीटीआय ट्वीट -
Court in Mumbai asks police to initiate inquiry against actor Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel for allegedly posting 'hateful' and 'derogatory' statements against a particular community on social media
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2020
सय्यद म्हणाले होते, दोन धार्मिक गटांमध्ये जातीय तणाव पसरवण्यासाठी कंगनाची बहिण रंगोलीनेही सोशल मीडियावरही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. कंगनाने केलेल्या टिपण्णीवर तक्रारी दाखल झाल्यांनतर, वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता कोर्टाने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.