Anurag Kashyap and Taapsee Pannu (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापे टाकल्यानंतर आज त्यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले आहे. यात दोन्ही कलाकारांवर कारवाई सुरु असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांचे ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅट्स, हार्ड डिस्कची देखील तपासणी सुरु आहे. तपासादरम्यान सापडलेल्या 7 बँक लॉकर्सचीही चौकशी करण्यात येत आहे. (Anurag Kshyap, Taapsee Pannu यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया)

आयकर विभागाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, इन्कम टॅक्स विभागामार्फत शोध आणि सर्वेक्षण ऑपरेशन 3 मार्चपासून सुरु करण्यात आले. त्यात दोन मोठ्या फिल्म प्रॉडक्शन कंपन्या, एक आघाडीची अभिनेत्री आणि दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा समावेश आहे. यांच्या मुंबईतील मालमत्तेची चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथेही शोध मोहीम राबविण्यात येत आहेत. घर आणि कार्यालयासह विविध 28 जागी तपास सुरु आहे.

आयकर विभागाने जारी केलेले स्टेटमेंट (Photo Credits: Facebook)

 

निवेदनात पुढे आयकर विभागाने म्हटले आहे की, फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या बॉक्स ऑफिसमधील प्रत्यक्ष कमाई आणि जाहीर केलेल्या आकडेवारीत बराच फरक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आणि यामुळे करांमध्ये गडबड असल्याचे पुरावे सापडले आहेत. दरम्यान, 30 कोटी रुपयांबाबत स्पष्टीकरण देण्यास कंपनीचे अधिकारी अमसर्थ आहेत. यामध्ये प्रॉडक्शन हाऊस, चित्रपट दिग्दर्शक आणि शेअर होल्डर्स सुमारे 350 कोटी रुपयांच्या कराच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तापसी पन्न, अनुराग कश्यप यांच्या शिवाय मधु मंटेना आणि विकास बहल यांच्याही कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.