Ileana D'Cruz: इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई होणार आहे. मायकेल डोलनसोबत लग्न केल्यानंतर, ऑगस्ट 2023 मध्ये तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिवा होता. त्यानंतर आता इलियाना डिक्रूझने (Ileana D'Cruz) दुसऱ्या आई होणार असल्याचे संकेत दिले आहते. इलियानाने 1 ऑगस्ट 2023 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव कोआ फिनिक्स डोलन असे ठेवले. आता, ती पुन्हा तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
इलियाना डिक्रूझने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. जिथे ती प्रेग्नन्सी टेस्ट किट हातात धरलेली दिसली. दरम्यान, तिने उद्याप स्वतः आई होणार असल्याची घोषणा केली नाही. (Vicky Kaushal Reaction On Chhaava Becomes Biggest Opener: 'छावा' चा प्रतिसाद पाहून भारावला विक्की कौशल;'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' म्हणत शेअर केली पोस्ट)
तिने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये काही खाद्यपदार्थ ठेवले आहेत आणि लिहिले आहे की "तुम्ही गर्भवती आहात हे कोणालाही न सांगता मला सांगा." आता या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. प्रत्येकजण अभिनेत्रीला तिच्या दुसऱ्या गर्भधारणेबद्दल विचारत आहे.
इलियानाने तिच्या लग्नाबद्दल काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे तिने पहिल्यांदाच तिच्या गरोदरपणाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याबद्दल अनेकांना अनेक महिने प्रश्न पडला होता. यापूर्वी, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, तिने अखेर तिच्या लग्नाबद्दलचे मौन सोडले होते.