I for India: आमिर खान, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा यांसह जगभरातील 85 सेलिब्रिटी उद्या Facebook वर सादर करणार Live Performance; जाणून घ्या वेळ व इतर माहिती
Aamir Khan, Aishwarya Rai Bachchan, Will Smith (Photo Credits: Facebook, Instagram)

काही दिवसांपूर्वी पॉपस्टार लेडी गागाच्या (Lady Gaga) कोरोना व्हायरससाठीचा रिलीफ कॉन्सर्ट, 'वन वर्ल्डः टुगेदर अॅट होम' (The One World: Together At Home) साठी जगभरातील अनेक कलाकार एकत्र आले होते. आता भारतातही हा प्रयोग होऊ घातला आहे. रविवारी 20 वर्षे जुना चॅरिटी इव्हेंट प्लॅटफॉर्म ‘गिव इंडिया’ (GiveIndia) द्वारे, या रविवारी 3 मे रोजी फेसबुक (Facebook) वर एक कॉन्सर्ट होणार आहे, ज्याचे नाव आहे ‘आय फॉर इंडिया’ (I For India), यामध्ये 85 हून अधिक सेलेब्ज एकत्र येणार आहेत. या मैफिलीचा हेतू कोरोना विषाणू (Coronavirus) पीडितांसाठी निधी गोळा करणे आणि घरी असलेल्या लोकांचे मनोरंजन करणे हा आहे.

माधुरी दीक्षित ट्विट -

या कार्यक्रमात शाहरुख खान (Shah Rukh Khan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), करण जोहर, जोया अख्तर, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), कतरिना कैफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, हृतिक रोशन, अरिजीत सिंग, दिलजीत दोसांझ, सिद्धार्थ मल्होत्रा, एआर रहमान, आयुष्मान खुरानासह इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज भाग घेणार आहेत. तसेच या कार्यक्रमात जोनास ब्रदर्स, मिंडी कलिंग, विल स्मिथ आणि ब्रायन अ‍ॅडम्ससारखे हॉलीवूड स्टारसुद्धा सहभागी होतील. (हेही वाचा: लेडी गागासह शाहरुख खान, प्रियंका चोप्रा यांनी सादर केला व्हर्च्युअल कॉन्सर्ट; कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी जमवले तब्बल 12.8 दशलक्ष डॉलर्स)

कोरोना व्हायरसविरुद्धच्या संकटात निधी गोळा करण्यासाठी सेलेब्ज त्यांच्या घरातून छोटे छोटे परफॉरमन्स देणार आहेत. या कार्यक्रम 3 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता https://www.facebook.com/facebookappIndia/ या ठिकाणी सुरु होईल. चार तासांच्या मैफलीत 85 हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स परफॉर्मन्स देतील. गिव्ह इंडिया हा 20 वर्षे जुना डोनेशन प्लेटफॉर्म आहे, ज्याचे संस्थापक व्यंकट कृष्णन आहेत. हे व्यासपीठ 1250 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना 13 लाखांहून अधिक देणगीदारांच्या माध्यमातून निधी प्रदान करते. ज्याचा उपयोग बर्‍याच सामाजिक कार्यात होतो. आता फेसबुकच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.