Shah Rukh Khan, Priyanka Chopra, Lady Gaga (Photo Credits: Instagram)

जगभरात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत असलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आपल्यापरीने उपयोजना करीत आहे. या लढाईमध्ये सामान्य नागरिक, सेलेब्ज, ख्यातनाम व्यक्ती, धर्मादाय संस्था अशा अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, आता पॉपस्टार लेडी गागाच्या (Lady Gaga) कोरोना व्हायरससाठीच्या रिलीफ कॉन्सर्ट, 'वन वर्ल्डः टुगेदर अॅट होम' (The One World: Together At Home) ने अमेरिकेत सुमारे 12.8 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. 'Sshobiz.com' च्या वृत्तानुसार, बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) देखील या मैफिलीचा हिस्सा होते. दोन तास चाललेल्या या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लेडी गागासह स्टीव्ह वंडर, पॉल मॅककार्टनी, एल्टन जॉन, लिजो आणि टेलर स्विफ्ट यांच्यासह 70 दिग्गजांनी सादरीकरण केले.

खास निधी गोळा करण्यासाठी या मैफिलीचे आयोजन केले नव्हते, मात्र परंतु 18 एप्रिल रोजी झालेल्या या मैफिलीने संपूर्ण अमेरिकेतील लोकांना दान देण्यास प्रेरित केले. प्रियंकाने निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या उपस्थित केल्या होत्या. लेडी गागाने आपल्या चाहत्यांना आशेचा संदेश देत काही गाण्यांचे परफॉर्मन्स दिले. तिने आपल्या गाण्यांमध्ये रेशन दुकानात काम करणारे लोक, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि अशात इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. बियॉन्सीने कोणतेही गाणे गायले नाही, परंतु एक व्हिडिओ मेसेज शेअर केला. टेलर स्विफ्टने पियानोवर गाऊन या मोहिमेस हातभार लावला. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या लढाईत शाहरुख खानही पुढे सरसावला; PM, CM Fund ला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण, अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार)

 

डब्ल्यूएचओ (WHO) कोरोना व्हायरस साथीशी लढणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी एक विशेष मोहीम राबवित आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना 'लव्ह लेटर' असे लेडी गागाने याचे वर्णन केले आहे.

Hundred Trailer: Rinku Rajguru झळकणार हिंदी वेबसिरिज मध्ये; ट्रेलर पाहून व्हाल थक्क - Watch Video 

यामध्ये जागतिक स्तरावरील सेलिब्रिटी होम म्युझिक कॉन्सर्ट, कॉमेडी परफॉरमंस आणि वैयक्तिक स्टोरीज शेअर करताना दिसत आहेत. त्याअंतर्गत पॉप सिंगर लेडी गागाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण मोहिमेला 'वन वर्ल्ड: टुगेदर अॅट होम' असे नाव देण्यात आले. हा कॉन्सर्ट टीव्हीवर प्रसारित करण्यात आला.