War Teaser: अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा जबरदस्त अॅक्शन सीन्स असलेला 'वॉर' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित
War Teaser (Photo Credits: Youtube)

डान्समध्ये अव्वल असलेले बॉलिवूडमधील दोन हँडसम हंक म्हणजे हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा जबरदस्त अॅक्शन सीन असलेला 'वॉर' (War Teaser) चित्रपटाचा टीजर अखेर प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये टायगर आणि हृतिक चा लूक खूपच हटके असून अभिनेत्री वाणी कपूरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली हा चित्रपट बनविण्यात आला असून आदित्य चोपड़ा (Aditya Chopra) या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टायगर श्रॉफ ची जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले तेव्हापासून हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यात प्रेक्षकांना बरेच साम्य दिसत होते. त्यामुळे भविष्यात हा दोघांचा एकत्र सिनेमा यावा अशी कित्येकांची इच्छा होती. त्यानंतर हे दोघे एका चित्रपटात एकत्र दिसणार अशी चर्चा होती. मात्र त्या चित्रपटाबद्दल काहीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. मात्र हृतिक आणि टायगर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'वॉर' (War Teaser) चित्रपटाचा टीजर पाहून प्रेक्षकांची प्रतिक्षा संपलीय. पाहा 'War' चा भन्नाट टीजर

लूक, डान्स आणि अॅक्शनच्या बाबती अव्वल असलेले बॉलिवूडचे दोन हँडसम हंक हृतिक आणि टायगर ला एकत्र पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे. या टीजरमध्ये उत्कृष्ट लोकेशन्स, अॅक्शन सीन्स पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा- Super 30: बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन च्या 'सुपर 30'ची धूम, दोन दिवसात बक्कळ कमाई

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वाणी कपूर चा ही यात हॉट लूक पाहून तिची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.