Hrithik Roshan in Super 30 (Photo Credits: Twitter)

हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचा सिनेमा 'सुपर 30' (Super 30) चे पोस्टर रिलिज झाले असून लवकरच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हृतिक रोशन याने 'सुपर 30' सिनेमाचे पोस्टर शेअर करत एक खास संदेशही दिला आहे. या पोस्टरमध्ये हृतिक काही मुलांसह आनंदात पावसात भिजताना दिसत आहे.

हृतिकने पोस्टर शेअर करत लिहिले की, "मिसाल बनो. हकदार बनो. सुपर 30 चा ट्रेलर 4 जून रोजी प्रदर्शित होईल."

हृतिक रोशन याचे ट्विट:

'सुपर 30' हा सिनेमा 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कंगना रनौत हिच्या 'मेंटल है क्या' सिनेमाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी सिनेमा लवकर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे 'सुपर 30' हा सिनेमा 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

लैंगिक शोषणाच्या आरोपातील असलेल्या दिग्दर्शक विकास बहल यांना प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र क्लिन चीट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा सिनेमात दिग्दर्शनाचे श्रेय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.