हृतिक रोशन म्हणतो मी जर का क्रिश असतो तर कोरोना संपल्यावर सर्वात आधी 'हे' काम केलं असतं!
Hritik Roshan (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) काळात सर्व सिनेमा, मालिका, शोजचे शूटिंग बंद आहे. अशावेळी अनेक कलाकार आपल्या कुटुंबाच्या सोबत आपला फ्री वेळ घालवत आहेत, यातील अनेक छोट्या छोट्या क्षणांचे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर करत आहेत. असाच एक फोटो अलीकडे ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याने सुद्धा शेअर केला होता. यामध्ये हृतिक आपल्या घराच्या बाल्कनीत मुलांसोबत उभा आहे. यावेळी त्याच्या हातात एक पांढऱ्या रंगाची वस्तू दिसून येत आहे, अनेकांनी तर्क लावून ही वस्तू म्हणजे सिगरेट असल्याचे म्हंटले आणि हृतिक मुलांसोबत उभा राहून सिगरेट ओढत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. अखेरीस या चर्चांना विराम देण्यासाठी स्वतः हृतिकनेच एक ट्विट करून स्पष्टीकरण दिले. यामध्ये त्याने "मुख्य म्हणजे मी सिगरेट घेतच नाही असे सांगितले. तसेच, जर का आपण, क्रिश असतो तर आपण या जगातून सर्व सिगरेट नष्ट करून टाकल्या असत्या" अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे.

हृतिक रोशन ने हा फोटो शेअर करताच त्याच्या अनेक फॅन्सनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला, काहींनी याच पोस्ट वर हातात सिगरेट आहे का असा सवालही केला. यावर इंस्टाग्राम पोस्ट वर त्याने काहीही उत्तर दिले आहे. तर काही वेळाने याच पोस्ट ला ट्विटरवर सुद्धा अनेकांनी प्रश्न केला. यावर मात्र उत्तर देताना हृतिकने आपली बाजू स्पष्ट केली. हृतिकचा हा रिप्लाय अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. सैफ अली खान याच्या Live Interview मध्ये अचानक आलेल्या तैमूर याने विचारला प्रश्न; पहा व्हिडिओ

हृतिक रोशन पोस्ट

हृतिक हा बॉलिवूडच्या फिटनेस फ्रीक सेलिब्रिटींमध्ये गणला जातो. आपले आरोग्य सुधृढ ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या उत्तम सवयी आणि व्यायाम यांचे महत्व तो नेहमीच आपल्या फॅन्सना सांगत असतो अशातच त्याचा आपल्याच मुलांसोबतचा हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता.