Hina Khan Hospitalised: अभिनेत्री हिना खान (Hina Khan) च्या चाहत्यांसाठी एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला खूप ताप आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
हिना खानने सोशल मीडिया अकाऊंटवरून दिले हेल्थ अपडेट -
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात थर्मामीटर दिसत आहे, तिच्या शरीराचे तापमान 102 आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मला खूप ताप आहे आणि गेल्या चार रात्री माझ्यासाठी खूप वाईट निघाल्या. माझ्या शरीराचे तापमान सतत 102-103 असते. आता उर्जा उरलेली नाही. ज्यांना माझी काळजी आहे, त्यांना कळवा की मी लवकरच परत येईन. दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अभिनेत्रीने लिहिले आहे की, लाइफ अपडेट. चौथा दिवस. (हेही वाचा - Year Ender 2023: कियारा अडवाणी, परिणीती चोप्रा, स्वरा भास्कर यांच्यासह 'या' सेलिब्रिटींनी 2023 मध्ये बांधली लग्नगाठ, पहा खास फोटोज)
नुकतीच हिना खान तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटात अभिनेत्री आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकत आहे. तिचा हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट चमकदार कामगिरी करत आहे.
हा चित्रपट इंग्रजी कादंबरी लेखक एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित चित्रपट आहे. जो बाहेरच्या जगापासून अलिप्त राहतो. एक भयंकर रोग त्यांच्या समाजावर होतो, ज्यामुळे त्या समाजातील नवीन पिढी दृष्टीविना जन्माला येते. या चित्रपटात हिना खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हिनासोबत या चित्रपटात इनामुलहक, प्रद्युमन सिंग मॉल, अनुष्का सेन, नमिता लाल, मीर सरवर, जितेंद्र राय, अहमर हैदर आणि हुसैन खान यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत.