Himani Shivpuri Tests Positive For Coronavirus: चित्रपट व टीव्ही अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांना कोरोना विषाणूची लागण; संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली स्वतःची करून घेण्याचे आवाहन
Himani Shivpuri (Photo Credits: Instagram)

गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. कालच आफताब शिवदासानीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. आता प्रसिद्ध चित्रपट व टीव्ही अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. सध्या 59 वर्षीय हिमांशी शिवपुरी 'हप्पू की उलटन पलटन' मध्ये कटोरी देवीची भूमिका आकारत आहेत. हिमानी शिवपुरी यांनी आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

याबाबत केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हिमानी म्हणतात, ‘सुप्रभात, मी आपल्‍याला हे सांगू इच्छिते की, मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी.’ सूत्रांनी सांगितले की, हिमानी अ‍ॅड शुटसाठी गेल्या होत्या त्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली आणि त्वरित त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ती सकारात्मक असल्याचे आढळले आहे.

पहा पोस्ट -

याबाबत बोलताना हिमानी म्हणाल्या, ‘मला होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आआले आहे. मला मधुमेहासारखे इतर आजार आहेत, म्हणून डॉक्टरांनी मला इस्पितळात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे, नाहीतर मी घरी वेगळी राहिली असते. हिमानी शिवपुरी सध्या ज्या शो मध्ये काम करत आहेत त्यामध्ये, कामना पाठक, योगेश त्रिपाठी, जेहरा सेठजीवाला, संजय चौधरी आणि विश्वनाथ चटर्जी यांसारखे कलाकार आहेत. योगायोगाने, या शोचे निर्माते संजय कोहली यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा:  टीव्ही अभिनेत्री सारा खान हिला कोरोनाची लागण; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती)

दरम्यान, काल प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासानीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची त्याने स्वतः माहिती दिली. सध्या त्याला घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापूर्वी अभिनेता अर्जुन कपुर सोबत त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोड़ा हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. टीव्ही अभिनेत्री सारा खानलाही हा संसर्ग झाला आहे.