रणवीर सिंग और दीपिका पादुकोण (Photo Credits: Instagram)

सुप्रसिध्द अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. बारा वर्षापूर्वी बॅंन्ड बाजा बारात या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा रणवीर आज या चंदेरी दुनियेतील सुपरस्टारपैकी (Superstar) एक आहे. बारा वर्षाच्या या प्रवासात रणवीरने अनेक उतार चढाव पाहिलेत पण या सगळ्यातून मार्ग काढत रणवीर सिंह प्रसिध्दीच्या उंच शिखरावर पोचला आहे. या बारा वर्षात रणवीरने केवळ प्रसिध्दीचं नाही तर मोठा चाहता वर्गही कमावला आहे. बॉलिवूडवर (Bollywood) नेपोटीझमचा (Nepotism) टॅग लावत बॉलिवूडला ट्रोल (Troll) करणाऱ्यासाठी रणवीर सिंह हे एक उत्तम उत्तर आहे.

 

2010 मध्ये अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बरोबर  बॅंन्ड बाजा बारात (Band Baja Barat) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यात त्याने मिडल क्लास बॉय बिट्टूची भुमिका साधत भुमिकेस योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. यशराज (Yashraj Films) बॅनरचा हा सिनेमा हीट झाला नसला तरी रणवीरच्या अभिनयाने मात्र सगळ्याची मन जिंकली. त्यानंतर रणवीरने लेडिज वर्सेस रिकी बेहेल (Ledies Vs Ricky Behel) किंवा लूटेरा (Lootera) सारखे सिनेमे केलेत पण त्यात त्याला फारस यश मिळालं नाही. त्यानंतर 2013 मध्ये रामलीला (Ramleela) या सिनेमाने रणवीरच आयुष्यचं बदलवून टाकलं. अभिनेत्री दिपीका पदुकोण (Deepika Padukone) बरोबरचा रामलीला हा रणवीरचा सुपरहीट सिनेमा ठरला. त्यानंतर रणवीरने गुंडे (Gundey), बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), गली बॉय (Gully Boy), पद्मावत (Padmavat), सिंबा (Simba) सारख्या एकापेक्षा एक सिनेमातून सगळ्यांची मन जिंकली. (हे ही वाचा:-Shaktimaan: मोठ्या पडद्यावर 'शक्तीमान'चे पुनरागमन, 'या' बॉलिवूड अभिनेत्याला सुपरहिरो भूमिकेची ऑफर!)

 

रणवीरने अभिनेत्री दिपिका पदूकोण बरोबर रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत हे तीन सिनेमे केलेत आणि हे तीनही सिनेमे सुपर हीट ठरले. 2018 अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दिपीका पदूकोण विवाह बंधनात अडकले. बॉलिवूडच पावर कपल (Power Couple) म्हणून आज रणवीर दिपाका या दामपत्याची ओळख आहे. तरी रणवीरने आज वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण केलं असुन रणवीरचे फॅन्स त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.