देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यात लॉकडाऊनही वाढत चालल्यामुळे लोकांनी मनोबळ ढासळत आहे. अशा स्थितीत लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 'गुजर जाएगा' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये 60 हून अधिक लोकांचा सहभाग आहे. यात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सानिया मिर्जा (Sania Mirza) , लिएंडर पेस, महेश भूपती, सनी लियोन सह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला आहे. यांच्यासोबत सोनू निगम, श्रेया घोषाल, कैलाश खेर यांसारख्या गायकांनी देखील सहभाग घेतला आहे.
वरुण प्रभुदयाल गुप्ता आणि जय वर्मा या गाण्याचे निर्माते आहेत. जजिम शर्मा या गाण्याचे संगीतकार असून सिद्धांत कुशल यांनी हे गाणे लिहिले आहे. बिग बींनी हे गाणे नरेट सुद्धा केले आहे. महेश मांजरेकर यांनी कोविड योद्धांसाठी रचले 'We Can, We Shall' हे गाणे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकरसह अनेक मराठी कलाकारांचा सहभाग, Watch Video
श्रेया घोषाल सांगते, "अमिताभ सरांनी हे गाणे ज्या पद्धतीने सांगितले आहे ते ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. तुम्हाला विश्वास बसेल की प्रत्येक काळ्या रात्री नंतर सूर्योद्य होतो. मी या गाण्याचा एक भाग असल्यामुळे मी खूश आहे."
कोरोना सारख्या महामारीमध्ये हे गाणे अनेकांना प्रेरणा देईल. जगण्याचे बळ देईल. त्यामुळे तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा असे सनी लियोन ने सांगितले आहे.