व्हिडिओ : गणेश चतुर्थीनिमित्त अनुष्का-वरुणने दिला खास संदेश
वरुण धवन, अनुष्का शर्मा (Photo Credits : Twitter)

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्माचा सुई धागा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून काही खास संदेश देण्यात येणार आहे. तोच संदेश गणेश चतुर्थीनिमित्त दोघेही आपल्या चाहत्यांना देत आहेत. अनुष्का शर्माने एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुईधागाच्या टीमने पर्यावरणपूरक गणपती बनवले आहेत. हीच बाप्पाची प्रतिमा पाहुन वरुणला अत्यंत कूल भासली.

हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने लिहिले की, ''या शुभप्रसंगी आम्ही धाग्यांनी बनवलेला इको फ्रेंडली गणपती बाप्पासोबत हा सण साजरा करत आहोत.''

आपण जर इको फ्रेंडली गणपती बाप्पांसह हा सण साजरा केला तर यामुळे पर्यावरणाला नुकसान पोहचणार नाही, असा संदेश अनुष्का-वरुण या निमित्ताने देत आहेत.

अनुष्का-वरुणचा सुई धागा हा सिनेमा मेड इन इंडियाच्या थीमवर बेतलेला आहे. ट्रेलरमध्येही हे पाहायला मिळते. या सिनेमाचे दिग्दर्शन शरत कटारिया यांनी केले असून निर्मिती मनिष शर्माने केली आहे. हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.