Karan Johar | File image

धर्मा प्रोडक्शनचा मालक करण जोहर (Karan Johar) याच्या घरी काही वर्षांपूर्वी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्टीचा वायरल व्हिडिओ काही दिवस चर्चेमध्ये आहे. यामध्ये सेलिब्रिटीज ड्रग्सचं सेवन करत असल्याच्या चर्चा रंगल्या, आरोप झाले. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टच्या दुसर्‍या अहवालातही अशाप्रकारे कोणत्याही नशिल्या पदार्थांचा त्यापार्टीत समावेश नसल्याचं सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा अहवाल एनसीबी म्हणजेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो कडे देण्यात आला आहे. NCB Arrests TV Actress Preetika Chauhan: टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान आणि एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणी नारकोटिक्स विभागाकडून अटक; 99 ग्रॅम गांजा केला जप्त.

 

गुजरात मध्ये गांधी नगर FSL ने त्यांचा अंतिम अहवाल बनवला असून त्यामध्ये ड्रग्स सारखा कोणता पदार्थ किंवा मटेरियल दिसत नसल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये केवळ पांढर्‍या रंगाच्या इमेजची रिफ्लेक्शन ऑफ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्टाफमधील कोणताही संदिग्ध व्यक्ती व्हिडिओत नाही. दरम्यान अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी वायरस व्हिडिओवर आक्षेप घेत एनसीबी मध्ये तक्रार दाखल केली होती.

एनसीबीकडे तक्रार येताच एजंसीने फॉरेंसिक टेस्ट साठी व्हिडिओ पाठवत तपस सुरू केला होता. या तपासामध्ये समोर आलेल्या गोष्टीनुसार, 2018 चा व्हिडिओ बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा होता. तो वायरल झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, दुसर्‍या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्येही या पार्टीत ड्रग्स घेतल्याचं स्पष्ट होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, सारा अली खान यांची एनसीबीने चौकशी केली आहे. तर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील ड्र्ग्स कनेक्शनमध्ये चौकशी झाली, अटक झाली. सध्या रिया जामीनावर सुटली आहे.