John Paul (PC - Twitter)

John Paul Passed Away: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मल्याळम निर्माते आणि लेखक जॉन पॉल (John Paul) यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. जॉन पॉल यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता केरळमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन पॉल गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णालयात दाखल होते. मात्र, शुक्रवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांनी काल सर्वांचा निरोप घेतला. जॉन पॉलच्या उपचारासाठी त्याच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी सोशल मीडियावर पैसे उभे केले. यावेळी केरळ सरकारनेही पुढे येऊन 2 लाख रुपयांची मदत केली होती. त्याचवेळी आता त्यांच्या निधनानंतर चित्रपट जगतातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (हेही वाचा - Sidharth Malhotra-Kiara Advani Break Up: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा झाला ब्रेकअप; काय आहे वेगळं होण्यामागचं कारण? जाणून घ्या)

मल्याळम अभिनेता कुंचाको बोबनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून जॉन पॉल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, 'त्यांनी अनेक आत्मास्पर्शी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ते सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील."

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunchacko Boban (@kunchacks)

जॉन पॉलच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्यांनी त्यांच्या आयुष्यात 100 हून अधिक चित्रपट लिहिले आहेत. ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरले आहेत. नाम चमाराम, यात्रा आदी चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. एवढेचं नाही तर त्यांनी भारतन, सत्यन एंथिक्कड़ आणि जोशी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केले. याशिवाय जॉन पॉलने अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.