TV Actor Firoz Khan Passes Away: 'भाबीजी घर पर हैं' फेम फिरोज खान यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Firoz Khan (PC - Instagram)

TV Actor Firoz Khan Passes Away: टीव्ही जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'भाबीजी घर पर हैं' अभिनेता फिरोज खान (Feroze Khan) यांचं निधन झालं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नक्कल करून आणि अभिनय करून प्रसिद्ध झालेल्या फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 23 मे रोजी सकाळी त्यांनी बदायूंमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना अमिताभ यांचा डुप्लिकेट म्हणायचे. आता त्याच्या निधनाने टीव्ही अभिनेत्याचे चाहते आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. फिरोज यांच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

फिरोज खान यांचे निधन -

फिरोज हे फक्त टीव्हीवरच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीत त्याच्या मिमिक्री आणि बिग बींच्या अभिनयासाठी जगभर ओळखले जात होते. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट बनून स्टारडम मिळवल्यानंतर फिरोज खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गुरुवारी, 23 मे रोजी पहाटे फिरोज खान यांचे उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (हेही वाचा - Shah Rukh Khan Hospitalized: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान रुग्णालयात दाखल, IPL सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास)

अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट फिरोज खान यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. 'भाबीजी घर पर हैं!', 'जिजा जी छत पर हैं', 'साहेब बीबी और बॉस', 'हप्पू की उल्टान पलटन' आणि 'शक्तिमान'मध्येही ते दिसले होते. याशिवाय, त्यांनी गायक अदनान सामीचे सुपरहिट गाणे 'थोडी सी तू लिफ्ट करा दे'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by FIROZ KHAN (@ifirozkhanofficial)

फिरोज खान यांनी 4 मे रोजी बदाऊन क्लब येथे मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स दिला, ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले. फिरोज खान सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. अभिनेत्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने अनेक चित्रपट कलाकारांची नक्कल केली, ज्यात दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचा समावेश आहे.