Aamir Khan पाठोपाठ 'दंगल' गर्ल Fatima Sana Shaikh सुद्धा आढळली कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
Fatima Sana Shaikh (Photo Credit: Twitter)

आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. आमिर खान पाठोपाठ मागील आठवड्यात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकायला मिळाली. आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण या कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यातच आता आमिरची 'दंगल' चित्रपटात असलेली सहकलाकार फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिला देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळत आहे. फातिमाने सोशल मिडियावरुन आपण कोविड पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) झाल्याचे सांगितले आहे. आमिर आधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

फातिमाने सोशल मिडियावर पोस्ट लिहून सांगितले आहे की, "मला कोरोनाची लागण जाली आहे. सध्या माझी तब्येत चांगली आहे आणि मी योग्य ती काळजी घेत आहे. तसेच सर्व गाईडलाईन्सचे पालन करत आहे. त्याचबरोबर मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल तुम्हा सर्वांचे आभार" असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- Aamir Khan पाठोपाठ R Madhavan कोरोना झाल्यानंतर '3 इडियट्स'चा सहकलाकार शर्मन जोशी ने आर माधवनच्या मजेशीर पोस्टला दिली तितकीच भन्नाट प्रतिक्रिया

Fatima Sana Shaikh Post (Photo Credits: Instagram)

याआधी फातिमा आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये पोहोचली होती. जेथे तिच्यासोबत अनिल कपूरसुद्धा होते. या चित्रपटाबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूडमध्ये झपाट्याने पसरत चाललेला कोरोना पाहता सर्व कलाकारांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंत संजय दत्त, सलमान खान आणि सैफ अली खान यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे.

दरम्यान 24 मार्च ला परफेक्शनिस्ट आमिर खान याला कोरोनाची लागण झाल्याचे बातमी समोर आली. या बातमीने त्याचे चाहते चिंतेत पडले. सध्या तो होम क्वारंटाइनमध्ये असून सर्व नियमांचे पालन करत आहे. त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.