Pandit Bhajan Sopori Passes Away: संतूर वादक आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित भजन सोपोरी (Pandit Bhajan Sopori) यांचे निधन झाले आहे. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 1948 मध्ये जन्मलेले पंडित भजन सोपोरी हे काश्मीरमधील सोपोर व्हॅलीचे रहिवासी होते. ते भारतीय शास्त्रीय संगीतातील सुफियाना घराण्यातील होते.
भजन सोपोरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी 1953 मध्ये पहिला परफॉर्मन्स दिला होता. अनेक दशकांच्या कारकिर्दीत, त्यांनी इजिप्त, इंग्लंड, जर्मनी, तसेच यूएसमध्ये कामगिरी केली. (हेही वाचा - गायक केके यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले; उद्या सकाळी 10 वाजता अंधेरी येथील निवासस्थानी होणार अंत्यसंस्कार (Watch Video))
वॉशिंग्टन विद्यापीठात संगीत शिकवले -
सोपोरी यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून आणि त्यांचे आजोबा एस सी सोपोरी आणि वडील शंभू नाथ यांच्याकडून पाश्चात्य शास्त्रीय संगीत शिकले. भजन सोपोरी यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात संगीताचे शिक्षणही दिले. भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल सोपोरी यांना 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या महिन्यात प्रसिद्ध संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि त्यांचे डायलिसिसही सुरू होते.
दरम्यान, पंडित भजन सोपोरी जी यांनी तीन रागांची रचना केली आहे. यामध्ये राग लालेश्वरी, राग पतवंती आणि राग निर्मल रंजनी यांचा समावेश आहे. सोपोरी यांनी देशातील राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी विविध गाण्यांचे रि-ट्यून तयार केले आहेत. यामध्ये कदम-कदम बढ़ाए जा, रफरोशी की तमन्ना, विजयी विश्व तिरंगा प्यारा, हम होंगे कामयाब, इत्यादीचा समावेश आहे.