Comedian Bonda Mani Passes Away: सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी (Comedian Bonda Mani) यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोंडा दीर्घकाळापासून किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील ओमंडूर सरकारी रुग्णालयात बराच काळ उपचार सुरू होते. परंतु, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत आणि त्यांचे निधन झाले.
बोंडा यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रिपोर्टनुसार, बोंडाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि 2022 पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची गंभीर स्थिती पाहून अभिनेता धनुष आणि विजय सेतुपती यांनीही मदतीचा हात पुढे केला. दोघांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. (हेही वाचा -Rashid Khan Health Update: दिग्गज शास्त्रीय गायक रशिद खान Ventilator Support वर; प्रकृती चिंताजनक)
वृत्तानुसार, 23 डिसेंबरच्या रात्री बोंडा मणी चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी अचानक बेशुद्ध पडला. यानंतर त्यांना तातडीने क्रोमपेट येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. बोंडा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सध्या बोंडा यांचे पार्थिव त्यांच्या पोळीचलूर येथील निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता क्रोमपेट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा -Artist Imroz Passes Away: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
Tamil actor-comedian #BondaMani passes away at 60https://t.co/gnfwDk7vto
— @zoomtv (@ZoomTV) December 24, 2023
बोंडा मणीचे खरे नाव केधीश्वरन आहे ज्याचा जन्म श्रीलंकेत झाला होता. 1991 मध्ये रिलीज झालेल्या पवुनू पावनुथन या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बोंडा हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. वयाच्या 60 व्या वर्षी, बोंडा मणी यांनी आघाडीच्या कलाकारांसोबत असंख्य तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयासोबतच त्यांचा राजकारणाशीही संबंध होता.