Tiger 3 मध्ये सलमान खान सोबत दिसणार Emraan Hashmi? पहा अभिनेत्यानेच केलेला 'हा' खुलासा
Salman Khan, Emraan Hashmi & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

सलमान खान (Salman Khan) काही दिवसांपूर्वीच 'टायगर 3' (Tiger 3) च्या शूटिंगा साठी रशिया ला रवाना झाला आहे. दरम्यान या सिनेमात अभिनेता Emraan Hashmi खलनायकाच्या भूमिकेत दिसेल अशी चर्चा होती. मात्र नुकतीच Emraan Hashmi ने यावर प्रतिक्रिया देताना तो 'टायगर 3' मध्ये नसेल असं स्पष्ट केले आहे. 'तुम्हांला कुणी सांगितलं मी सिनेमासाठी आधीच शूट करून ठेवलंय? कुणीही असं म्हणत असलं तरीही ते खरं नाही. मी यश राज फिल्म्सचा भाग नाही' असे त्याने Pinkvilla सोबत बोलताना सांगितलं आहे. नक्की वाचा: Tiger 3 च्या सेटवरुन Salman Khan चा नवा लूक समोर; पहा Photos.

YRF चा 'टायगर 3' हा तिसरा भाग आहे. या सिनेमाची कहाणी अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे. यात सलमान खास 'टायगर' तर कटरिना कैफ 'झोया' हे स्पाय एजंट म्हणून काम करत असल्याची भूमिका निभावत आहेत. जेव्हा यांच्यासोबत इमरान देखील झळकणार अशा बातम्या समोर आल्या तेव्हा प्रतिक्रिया देताना त्याने सलमान खान सोबत काम करणं हे स्वप्न असल्याचं त्याने म्हटलं आहे. 'मला या फ्रॅन्चायजी सोबत, सलमान सोबत काम करायला आवडेल. माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी मला आशा असल्याचं देखील PTI सोबत बोलताना म्हटलं आहे.

सलमान खान , कॅटरिना कैफ सध्या रशिया मध्ये 'टायगर 3' च्या शूटिंगला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या सिनेमातील लूकचे फोटो देखील समोर आले आहेत. 2012 साली 'एक था टायगर' हा पहिला सिनेमा समोर आला होता त्यामध्ये सलमान भारतीय स्पाय असून तो 'झोया' या पाकिस्तानी स्पायच्या प्रेमात पडतो असं दाखवण्यात आले होते. पुढे ही दोघे एकत्र काही काम करतात. 2017 साली आलेल्या या सिनेमाच्या 'टायगर जिंदा है' या सिक्वेल मध्ये ISIL कडून भारतीय नर्सचं झालेलं अपहरण यावर आधारित कहाणी दाखवण्यात आली होती.