'Judgementall Hai Kya' च्या प्रमोशनवेळी कंगना रनौत आणि पत्रकारामध्ये झालेली बाचाबाची बालाजी टेलिफिल्म्सला भोवली, संपुर्ण मीडियाची मागितली माफी
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड क्वीन कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयामुळे जितकी चर्चेत आहे तितकीच तिच्या रोखठोक बोलण्यावरुनही. मात्र यावेळी कंगनाच्या या स्पष्टवक्तेपणाचा फटका बालाजी टेलिफिल्म्स ला बसलाय. निमित्त होते बालाजी टेलिफिम्स् (Balaji Telefilms) प्रस्तुत 'जजमेंटल है क्या' (Judgemental Hai Kya)चित्रपटाच्या प्रमोशनचे. यात कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि पीटीआय वृत्तसंस्थेचा पत्रकार जस्टिन राव (Justin Rao)याच्याशी झालेल्या भांडणामुळे संपुर्ण मिडियाने कंगना रनौत वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या घटनेबद्दल कंगना रनौत आणि एकता कपूर ने सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी एन्टरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्डने केली होती.

त्यानुसार निर्माती एकता कपूरने माफीनामा जाहीर करुन सहमती दर्शवली आणि घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

जोपर्यंत कंगना झालेल्या घटनेबद्दल माफी मागत नाही, तोपर्यंत भविष्यात तिच्या कार्यक्रमांवर बहिष्कार कायम राहिल, असे गिल्डसच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

हेही वाचा- कंगना रनौत आणि पत्रकारामध्ये जोरदार भांडण, 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ (Watch Video)

जस्टिनने मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमाच्या प्रदर्शनावेळी तिच्या विरुद्ध काहीशी बातमी केली होती, ही बाब लक्षात येताच तिने त्याच्यावर आरोप लावायला सुरुवात केली. या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.