Saif Ali Khan and Taimur (Photo Credit: Twitter)

आज संपूर्ण जगभरात ईद साजरी केली जात आहे. मुस्लिम बांधवांच्या घरी आज छान पंचपक्वांनांचे बेत रंगतायत. यात बॉलिवूड कलाकार मंडळी देखील मागे नाहीय. लॉकडाऊन मुळे सर्व कलाकार घरी आहेत. यामुळे या दिनाचे औचित्य साधून अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याने खास आपल्या बायको करीना कपूर (Kareena Kapoor) साठी मटन बिर्याणी बनवली. करीनाने हा फोटो शेअर करुन सैफ आज आपल्यासाठी शेफ बनला असे सांगत आहे. करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसला हा फोटो ठेवला आहे.

करीना कपूर सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या पोस्टचा तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणूनच करीनाने ईद निमित्त हा खास फोटो शेअर केला आहे.

मटन बिर्याणीचा फोटो शेअर करुन करीनाने त्याखाली 'शेफ सैफू स्पेशल मटन बिर्याणी' असे लिहित ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीना ने सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसह बनवले जबरदस्त आर्टवर्क, सोशल मिडियावर शेअर केला फोटो

Biryani (Photo Credits: Instagram)

करीनाने या पोस्टसोबत सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, करीना लवकरच 'लाल सिंह चड्ढा' (Lal Singh Chaddha)मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसेल.