Drugs Case: अभिनेता एजाज खान याच्या चौकशीनंतर एनसीबीकडून  लोखंडवाला येथे छापेमारी, टीव्ही कलाकाराच्या घरातून ड्रग्ज जप्त
Ajaz Khan (Photo Credits: Twitter)

Drugs Case: मुंबई एनसीबीकडून काल रात्री अंधेरीतील लोखंडवाडाल परिसरात राहणाऱ्या एका टीव्ही कलाकाराच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी एजाज याच्या घरातून काही प्रकारचे ड्रग्ज सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, छापेमारी करण्यासाठी एनसीबी येणार असल्याचे कळताच त्याच्या काही मिनिटांपूर्वी अभिनेत्याने घरातून पळ काढला होता. ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एजाज याची चौकशी केल्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी कलाकाराच्या घरात एक परदेशी महिला सुद्धा राहत होती तिने सुद्धा पळ काढला आहे. एनसीबीकडून दोन्ही कलाकार आणि परदेशी महिलेचा शोध घेत आहेत.

एनसीबीने कोर्टात असे म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शादाब बटाटा आणि एजाज खान मध्ये काही संबंध असल्याचे समोर आले होते. एनसीबीने पुढे असे म्हटले की, त्यांच्या हाती व्हॉट्सअॅप चॅट्स, वॉइस नोट्स सुद्धा लागले आहेत. यावरुन असे स्पष्ट होते की, ड्रग्ज प्रकरणी एजाज खान याचा सुद्धा समावेश आहे. दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात यावी असे एनसीबीने कोर्टात म्हटले होते. मात्र एजाज याच्या वकिलांनी कोर्टात असे म्हटले आहे की, एजाज याच्या घरातून कोणतेही ड्रग्ज मिळालेले नाही. परंतु जी औषधे मिळाली ती त्याच्या पत्नीची आहेत.(Ajaz Khan Arrested by NCB: बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला ड्रग प्रकरणात एनसीबीकडून अटक; छापेमारीत मिळाल्या गोळ्या)

Tweet:

तर एनसीबी आणि एजाजचे वकील यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने एनसीबीची मागणी मान्य करत त्याच्या 3 दिवसांच्या कस्टडीला मंजूरी दिली आहे. त्यानंतर एजाज खान आता तीन दिवस एनसीबी कोठडीत राहणार आहे. एनसीबीला अशी अपेक्षा आहे की, आता काही बड्या व्यक्तीचा ड्रग्ज प्रकरणी पर्दाफाश होईल.