बॅकलेस टॉप घालून जीममध्ये वर्कआऊट करताना दिसली 'ही' अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का? पहा व्हिडिओ
Disha Patani (PC- Instagram)

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसने सर्वांना प्रेरित करत असतात. ते घरी असले किंवा सुट्टीत बाहेर फिरायला गेले तरी ते त्यांच्या वर्कआउटबाबत कधीही तडजोड करत नाही. बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीने जिममधील तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला तिला ओळखता येणं कठीण आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स तसेच कमेंन्ट दिल्या आहेत. या व्हिडिओत अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य काय आहे, हे तुम्हाला नक्की समजेल.

व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून दिशा पटानी (Disha Patani) आहे. कदाचित दिशाच्या काही चाहत्यांनी तिचा बॅकलेस टॉप व्हिडिओ पाहून तिला ओळखलं असेल. फिटनेस फ्रीक दिशा बॅकलेस टॉप आणि पिवळ्या शॉर्ट्समध्ये आहे. तिने आपले केस समोरच्या बाजून केलेले आहेत. (वाचा - Sanjay Raut on The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाबाबत जे राजकारण होत आहे ते योग्य नाही - संजय राऊत)

या व्हिडिओमध्ये दिशा अगदी सहजतेने व्यायाम करत आहे. तिने कॅप्शनमध्ये वेटलिफ्टिंगचा इमोजी शेअर केला आहे. दिशाच्या या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले - 'बेबी ऑन फायर.' एका यूजरने लिहिले की, 'मला असा फिटनेस हवा आहे.' एका यूजरने 'सेक्सी बॅक' असे म्हटले आहे. एकाने लिहिले आहे की, 'काय अप्रतिम जिम आणि काय अप्रतिम कौशल्य आहे.'

अलीकडेच दिशाने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती मालदीवच्या बीचवर आराम करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती तिच्या कुत्र्यासोबत दिसली. दिशाचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' असून त्यात अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे. 'एक व्हिलन रिटर्न्स'चे शूटिंग संपले आहे. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते.