Dilip Kumar Birthday 2019: हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार याांचा आज 97 वा वाढदिवस. रुपेरी पडद्यावरचे हे नाव इतके मोठे आहे की त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि सिनेजगतातील अन्य विशेष पुरस्कार जोडले गेले आहेत. एक उत्तम, मेहनती अशा या अष्टपैलू अवलियाने आज 97 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्यासाठी इतकी वर्ष म्हणावी तितकी सोपी नव्हती. मरणाच्या दारातून परत आलेले दिलीप कुमार यांच्या चिरतरुण चेहरा आजही अनेकांवर आपली प्रभावी छाप पाडतो.
अशा या हरहुन्नरी दिलीप कुमारांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
1) दिलीप कुमार यांचा जन्म 1922 मध्ये किस्सा ख्वानी बाजार, पेशावर मध्ये झाला. जन्मानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव युसूफ असे ठेवले होते. मात्र चित्रपटात पदार्पण केल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले.
2) दिलीप कुमार यांनी बार्नेस स्कूल, देओलाली मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. राज कपूर हे त्यांचे बालपणीचे मित्र होते.
3) दिलीप कुमार यांनी 1940 मध्ये बाबांसोबत झाल्याच्या वादात घर सोडले होते आणि पुण्याला गेले होते. मालमत्तेसाठी दिलीप कुमार यांना धमक्या; सायरा बानो यांनी मागितली नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत
4) पुण्यात आल्यानंतर त्यांची ओळख एका पारसी कॅफे मालकासोबत झाली. त्यांच्याकडे काम करत असताना त्यांनी स्वत:चा सँडविच स्टॉल सुरु केला.
5) 1942 मध्ये त्यांची बॉम्बे टॉकिजच्या मालकिन देविका राणीशी झाली. त्यांनी दिलीप कुमार यांना 1250 प्रति महिना पगार देऊन कथा लेखनाचे काम दिले. देविका राणीनेच त्यांना 1944 मध्ये 'ज्वर भाटा' या सिनेमात रोल दिला.
6) त्यानंतर त्यांनी जोगन, हलचल, बाबुल, देवदास, मधुमती सारखे अनेक हिट चित्रपट दिले. मुगल-ए-आजम या चित्रपटाने तर त्यांना चित्रपट सृष्टीत वेगळीच ओळख मिळवून दिली.
7) 1950 मध्ये चित्रपटामागे 1 लाख रुपये मानधन घेणारे ते पहिले अभिनेते होते.
8) 1966 मध्ये त्यांनी सायरा बानो शी लग्न केले. त्यावेळी सायरा बानू या 22 वर्षांच्या होत्या.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रपटसृष्टीपासून ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लेटेस्टली मराठी कडून ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.