नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (30 मे) दिल्लीत (Delhi) राष्ट्रपती भवनात पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री सुद्धा आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. दरम्यान या सोहळ्यासाठी बॉलिवूड मधील दिग्गज मंडळी उपस्थिती लावणार आहेत. सिनेसृष्टीतील अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
कंगना ही नेहमीच मोदी यांची समर्थक असल्याचे दिसून आली आहे. तसेच मोदी यांच्या कार्याचे कौतुक तिच्याकडून वारंवार केले जाते. त्यामुळे आज राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला कंगना उपस्थितीत राहणार आहे. त्याचसोबत पीएम मोदी यांची भुमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय सुद्धा यावेळी दिसून येणार आहे. तसेच बोमन इराणी ही उपस्थिती लावतील अशी शंका बाळगली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच अक्षय कुमार ही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Lok Sabha Election Results 2019: भाजप जिंकलेला पाहून कंगना रनौत हिने तळली भजी)
झी बिझनेस यांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह याला यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. परंतु त्याचा आगामी चित्रपट '83' साठी सुरु असणाऱ्या शूटिंगमुळे तो उपस्थित राहणार नाही आहे. रणवीर सिंह याच्याव्यतिरिक्त राजू श्रीवास्तव, अनुपम खेर, जावेद अख्तर, सलीम खान या सोहळ्याचा हिस्सा बनण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेले अभिनेते मनोज तिवारी, रवि किशन आणि सनी देओल सुद्धा उपस्थिती लावणार आहेत.