अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट जोडीपैकी एक आहेत. चित्रपटांमधील या दोघांच्या केमिस्ट्रीशिवाय ऑफ स्क्रीनदेखील या जोडीला चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले आहे. आज रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस (Second Wedding Anniversary) आहे. या दिवसाचे औचित्य साधून या दोघांनी सोशल मिडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत दोघांनीही काही रोमँटिक फोटोजही पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत. 2 वर्षांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे इटली येथे 14-15 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना रणवीरने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केली आहेत. जे पोस्ट करताना तो लिहितो, ‘आत्मे कायमचे जोडले गेले, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी गुड़िया दीपिका पादुकोण.' दीपिका पादुकोणने या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, 'एका शेंगामध्ये दोन वाटाणे. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा रणवीर. तू मला पूर्ण केलेस.’ ही पोस्ट लिहिताना दीपिका व रणवीर या दोघांनीही सेम फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो इटलीमध्ये क्लिक केले होते. यामध्ये दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला आहे, तर रणवीरनेही पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर नेहरू जॅकेट घातले आहे. (हेही वाचा: Happy Diwali: अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टीसह 'या' कालाकारांनी दिवाळीसाठी चाहत्यांसाठी सोशल मीडियात पोस्ट करत दिल्या खास शुभेच्छा)
View this post on Instagram
2018 मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचे इटलीतील लेक कोमो येथे लग्न झाले होते. या समारंभासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थिती होते. दीपिका आणि रणवीरने सिंधी आणि कोंकणी पद्धतीने लग्न केले होते. त्यांनतर त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यात बॉलिवूडच्या सर्व मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.