Deepika Ranveer Wedding: ...तर इतकी आहे दीपिका पदुकोणच्या अंगठीची किंमत
दीपवीर विवाहसोहळ्यातील फोटो (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) दोन दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवस आधी या चर्चांना अधिकच उधाण आले आणि मग दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या खरेदीपासून, दागिन्यांपर्यंत अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण झाली. दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)

चाहत्यांची उत्सुकता ताणल्यानंतर दीपिका-रणवीरने लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. यात दीपिकाच्या हातातील अंगठ्या स्पष्ट दिसत आहेत. परंतु, एंगेजमेंट रिंगकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. रणवीरने दीपिकाला साखरपुड्यात दिलेल्या अंगठीची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का?

रणवीरने दीपिकासाठी लग्नापूर्वीच एक स्पेशल अंगठी खरेदी केली होती. या अंगठीची किंमत 2 ते 2.7 कोटी असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिकाची अंगठी सर्वात महाग

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यावेळेस विराटने अनुष्काला 1 कोटींची अंगठी दिली होती. तर लवकरच विवाहबद्ध होणारी प्रियंका-निक या जोडीचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी पार पडला. त्यावेळेस निकने प्रियंकाला 2 कोटींची अंगठी दिली. तर अभिनेत्री सोनम कपूरच्या पती आनंद आहुजा याने सोनमला 90 लाखांची अंगठी दिली होती.