5 जानेवारीला दीपिका पादुकोण साजरा करणार आपला 34 वा वाढदिवस; जाणून घ्या काय असेल खास प्लॅन
Deepika Padukone (Photo Credits: Facebook/fanclub)

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या आगामी ‘छपाक’ (Chhapaak) या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. दीपिका येत्या 5 जानेवारी रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण यावेळी तिचा वाढदिवस खूप खास असणार आहे. यावेळी दीपिका आपला वाढदिवस पती रणवीर सिंहसोबत नव्हे, तर काही खास लोकांसह साजरा करणार आहे. यामुळे दीपिकाचा हा 34 वा वाढदिवस अतिशय संस्मरणीय बनणार आहे हे लक्षात येईल. तर यंदा 5 जानेवारी रोजी दीपिका लखनऊमध्ये (Lucknow) असणार आहे.

सर्वांनाच ठाऊक आहे की, दीपिका पादुकोण अ‍ॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवा हिचा बायोपिक करत आहे. चित्रपटात ती अ‍ॅसिड सर्व्हायव्हरची भूमिका साकारताना, स्वतःच्या हक्कासाठी लढताना दिसणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 5 जानेवारी रोजी दीपिका आपला 34 वा वाढदिवस अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पिडीतांसोबत साजरा करणार आहे. आपला संपूर्ण दिवस ती त्यांच्यासोबत व्यतीत करेल. आजूबाजूच्या अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पिडीता या वाढदिवसाचा हिस्सा असणार आहेत. (हेही वाचा: दीपिका पादुकोण चा लाल रंगाच्या ड्रेस मधील 'Red Hot' फोटो पाहून पती रणवीर सिंह दिली अशी रोमँटिक कमेंट)

वाढदिवसाच्या निमित्ताने लखनऊमध्ये दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पिडीतेच्या कॅफेमध्ये जाईल. इथेच दीपिका आपला वाढदिवस येथे साजरा करेल. यानंतर दीपिका छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना होईल. चित्रपटाविषयी बोलायचे छपाकचे दिग्दर्शन मेघना गुलजार (Meghna Gulzar) यांनी केले आहे. 10 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून, लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला चित्रपट आहे.