बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? पाहा फोटो
Deepika Padukone (PC- Instagram)

बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तिला ओळखणं खूपच कठीण आहे. या फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीच नाव दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) आहे. दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. दीपिका नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत दिव्या नारायण ही मैत्रिण आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोला रणवीर सिंहने Cuties! अशी कमेंट दिली आहे. (हेही वाचा - अभिनेता राजकुमार राव याचा चित्रपट 'तुर्रम खान' चे टायटल बदलले; आता 'हे' असेल नवीन नाव)

मागील काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण चांगलीच चर्चेत आली होती. दीपिकाच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दीपिका आगामी 'छपाक' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमामध्ये ती अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'छपाक' चित्रपत येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

This Humpty & Dumpty sat on a wall...& ate curd rice!!!😂😂😂 @divya_narayan4

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तसेच दीपिका '83' या चित्रपटातही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेता आणि पती रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.