Deepika Padukone And Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक दक्ष नागरिक योग्य ती खबरदारी घेत आहे. मग यातील कित्येक नागरिक ज्यांना आपले आदर्श मानतात ते बॉलिवूड सेलिब्रिटी कसे बरे मागे राहतील. नेहमी टीकेचे लक्ष्य असलेल्या सोशल मिडियावर सध्या #HandWashChallenge सुरु आहे. हे आव्हान आता सेलिब्रिटींनीही स्विकारल्या सुरुवात कले आहे. हे चॅलेंज स्विकारून ते लोकांना हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करत आहे. यात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anukshka Sharma) यांनी पुढाकार घेतला आहे.

दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा हिने कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी नागरिकांना #HandWashChallenge मधून आवाहन केले आहे.

पाहा दीपिका पादुकोण चे हँडवॉश चॅलेंज:

हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोनाच्या विळख्यातून कसे रहाल सुरक्षित? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून नागरिकांना मोलाचा सल्ला

पाहा अनुष्का शर्माचे हँडवॉश चॅलेंज:

या व्हिडिओमध्ये या दोघीही हँडवॉशन हात कसे धुवावे हे दाखवत आहे. आपण घरात असो वा कुठेही हात नीट स्वच्छ धुवा असे आवाहन या दोघी करताना दिसत आहे.

या प्राणघातक व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मोलाचा सल्ला दिला आहे. अमिताभ यांचा हा व्हिडीओ भारतीय रेल्वे प्रशासनाने जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.