Raju Srivastav Last Rite: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना उद्या देण्यात येणार शेवटचा निरोप; दिल्लीमध्ये होणार अंत्यसंस्कार
Raju Srivastava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Raju Srivastav Last Rite: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी वयाच्या 59 व्या वर्षी या जगाला निरोप दिला. गुरुवारी कॉमेडियनला दिल्लीत अंतिम निरोप देण्यात येईल. राजू यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांचे अंत्यसंस्कार मुंबई किंवा लखनऊ येथे होणार नाही. कुटुंबातील सदस्यांचे मत आहे की, दिल्ली त्यांच्या कुटुंबासाठी अधिक आरामदायक आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांचे शेवटचे संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर चालत असताना छातीत वेदना होऊ लागल्याने राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. 10 तारखेला राजूची एंजिओप्लास्टी घाईत केली गेली. त्या दिवसापासून राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. एंजिओप्लास्टीपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर होते. राजू यांना मुलगी अंतरा आणि मुलगा आयुषमन ही दोन मुलं आहेत. (हेही वाचा - Raju Srivastava Dies: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर CM Eknath Shinde, Defence Minister Rajnath Singh सह मान्यवरांकडून शोक व्यक्त)

आज सकाळी 10.15 च्या सुमारास राजू श्रीवास्तव यांना मृत घोषित करण्यात आले. राजू यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत आहे.