मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अजय देवगणसोबत पाहणार 'तान्हाजी' चित्रपट; मुंबईत प्लाझा मध्ये विशेष शो चे आयोजन
Uddhav Thackeray And Tanhaji Movie (Photo Credits: Twitter)

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत असलेल्या 'तान्हाजी' (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची आठवण करुन देणारा हा चित्रपट त्याच व्यक्तीसोबत पाहावा ज्याने ही भूमिका केली आहे असा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात आला. म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सह हा चित्रपट पाहणार आहे. मुंबईतील प्लाझा सिनेमागृहात या साठी विशेष शो ठेवण्यात आला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता हा शो होणार आहे. खुद्द चित्रपटातील तान्हाजीसोबत मुख्यमंत्री या चित्रपटाचा आनंद लुटणार आहे.

आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील प्लाझा सिनेमागृहात तान्हाजी चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक ही या चित्रपट पाहायला येणार आहेत.

हेदेखील वाचा- तान्हाजी: स्वत:च्या चित्रपटावर टीका केल्यानंतर सैफ अली खान ठरला सोशल मीडियावरील ट्रोल चा शिकार

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही काल नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला. भुजबळांनी ‘तान्हाजी’च्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला होता. आता मुख्यमंत्रीही हा सिनेमा पाहतील.

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.