Saroj Khan (Photo Credits: Instagram)

Choreographer Saroj Khan Death: बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचविणा-या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan)  यांचे निधन झाले आहे. बांद्राच्या गुरुनानक रुग्णालयात (Gurunanak Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून शुक्रवारी रात्री त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मधुमेह आणि अन्य शरीरासंबंधीच्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे.

सरोज खान यांच्या पश्चात त्यांचे पती बी.सोहनलाल, मुलगा हामिद आणि हिना आणि सुकन्या असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरोज खान माधुरी दिक्षित सह ऐश्वर्या राय, सलमान खान, श्रीदेवी, जूही चावला सारख्या अनेक कलाकारांना नृत्य शिकवले आहे.

Saroj Khan (Photo Credit: File)

सरोज खान यांच्याविषयी सांगायचे झाले तर केवळ 3 वर्षांच्या असल्यामुळे सरोजींनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम सुरु केले होते. त्यांना 1974 मध्ये 'गीता मेरा नाम' या चित्रपटात नृत्यदिग्दर्शिका म्हणून पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर त्या सलग 3 वेळा राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. हवाहवाई, एक दो तीन, धक धक करने लगा आणि डोला रे डोला सारखी अनेक हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे.