Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त अमिताभ बच्चन, मोहनलाल, धर्मेंद्र, सोनू सूद, जूनियर एनटीआर आदी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा!
अमिताभ बच्चन, मोहनलाल आणि जूनियर एनटीआर (Image Credit: Twitter)

Republic Day 2021: आज संपूर्ण देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रत्येकजण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन केले जात आहे. कोरोनाचं सावट असलं तरी, संपूर्ण देश आज देशभक्तीत मग्न आहे. सोशल मीडियावर तिरंगा रंगला आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लोक सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत. अशातचं चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देशवासियांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन ते मोहन लाल, धर्मेंद्र ते सोनू सूद यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा - ईद निमित्ताने सलमान खान आणि जॉन अब्राहमची होणार टक्कर; Republic Day च्या दिवशी अभिनेत्याने केली 'सत्यमेव जयते 2' च्या प्रदर्शनाची घोषणा)

धर्मेंद्र यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलं आहे की, हॅप्पी रिपब्लिक डे. आज आम्ही भारत मातेच्या 130 कोटी मुलांनी वचन द्यावे की, आम्ही एकत्रितपणे भारत माता सुशोभित करू.

प्रजासत्ताक दिनी सर्वचं सेलिब्रिटी चाहत्यांना शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत. अमिताभ बच्चन, मोहनलाल, जूनियर एनटीआर, दिलजीत दोसांझ यांनीही सोशल मीडियावर चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन - 

मोहनलाल - 

जूनियर एनटीआर - 

दिलजीत दोसांझ - 

तसेच दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदी नेत्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित केलं.