Sushant Singh Rajput: कॅलिफोर्निया राज्य विधानसभेकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा सन्मान; बहिण श्वेता सिंह किर्तीने स्वीकारला पुरस्कार
Sushant Singh Rajput, Shweta Singh Kirti (Facebook, Twitter)

Sushant Singh Rajput: आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. या दिवसाचे आवचित्त साधुन कॅलिफोर्निया राज्य विधानसभेकडून (California State Assembly) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सन्मानित करण्यात आलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांत तर्फे हा पुरस्कार स्वीकारला आहे. या पुरस्कारामुळे सुशांतच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

सुशांत चित्रपटसृष्टीप्रमाणेचं सामाजिक कामातदेखील तत्पर होता. त्याचं सामाजिक कार्य लक्षात घेऊन कॅलिफोर्नियाने त्याला हा पुरस्कार दिला आहे. किर्तीने आपल्या ट्विटर हँडलवरून पुरस्काराचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - Bigg Boss 14: सलमान खान बिग बॉसच्या सीझन साठी सज्ज; पहा नव्या प्रोमोची पहिली झलक)

किर्तीने या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांत सिंह राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे. तुम्ही आमच्यासोबत आहात का? कॅलिफोर्निया आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. #GlobalPrayersForSSR #Warriors4SSR #CBIForSSR #Godiswithus' असे हँशटॅगदेखील किर्तीने पोस्टमध्ये वापरले आहेत.

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी दररोज नव-नवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत.