Brahmastra चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज; पहा Alia Bhatt आणि Ranbir Kapoor चा रोमँटिक अंदाज
Brahmastra New Poster (PC - Instagram)

Brahmastra New Poster: सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) त्यांच्या लग्नासोबतच त्यांच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. रणबीर आणि आलिया लवकरच ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) ने चित्रपटातील केसरिया गाण्याची एक झलक चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत अयान मुखर्जीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रेम प्रकाश आहे! एक प्रेम - जे चित्रपटाच्या पलीकडे आणि जीवनात आगीसारखे पसरते. तर हे आहे, आमच्या प्रेमाचे पोस्टर! त्यासाठी वेळ योग्य वाटत आहे, आजकाल हवेत खूपचं प्रेम आहे. त्यासोबत केसरिया, प्रीतम (दादा), अमिताभ भट्टाचार्य, अरिजित यांच्या जादूची एक छोटीशी झलक.' (हेही वाचा - Adipurush: 'बाहुबली' दिसणार आता भगवान 'राम'च्या भूमिकेत, दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडून व्हिडिओ शेअर)

शेअर केलेल्या या लव्ह पोस्टरमध्ये रणबीर आणि आलिया खूप रोमँटिक अंदाजात एकमेकांसोबत पोज देताना दिसत आहेत. यासोबतच पोस्टर शेअर करताना दिग्दर्शकाने चित्रपटातील रणबीर आणि आलियाच्या पात्रांची नावेही लिहिली आहेत. या चित्रपटात रणबीर शिवाच्या भूमिकेत तर आलिया ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रॉडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाइट पिक्चर्स निर्मित व अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या 5 भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.