Dhanush Birthday: बॉलिवूडच्या 'रांझणा'ने हॉलिवूडमध्येही दाखवली ताकद, धनुषच्या वाढदिवशानिमित्त जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Dhanush (Photo Credit - Twitter)

दक्षिणात्य चित्रपटापासुन ते बाॅलिवूड आणि हाॅलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपली ओळख निर्माण करणारा धनुष (Dhanush) आज आपला 38 वाढदिवस (Dhanush Birthday) साजरा करत आहे. अभिनेता धनुष आता जागतिक अभिनेता बनला आहे. धनुषचे नाव अशा स्टार्सपैकी एक बनले आहे, ज्यांच्या बळावर कोणताही चित्रपट सुपरहिट करण्याची ताकद आहे. धनुषचा जन्म एखाद्या सेलिब्रिटीच्या पोटी झाला असेल, पण त्याच्या टॅलेंटच्या जोरावर त्याने स्वत:साठी एक मोठं स्थान निर्माण केलं आहे. तामिळ सिनेमापासून बॉलिवूड (Bollywood) आणि नंतर हॉलिवूडपर्यंत (Hollywood) धनुषने सर्वांची मनं जिंकली आहेत. आज (28 जुलै) धनुष त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या खास निमित्त आम्ही तुम्हाला धनुषशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

धनुषची सुरुवात

धनुषचे पूर्ण नाव वेकेंटस प्रभू कस्तुरी राजा आहे. धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी झाला. धनुषने त्याचे वडील कस्तुरी राजा दिग्दर्शित 'थुलुवधो इलामाई' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट हिट झाला आणि प्रेक्षकांना त्याचा अभिनय आवडला. वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या धनुषने फार कमी वेळात आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्वत:साठी एक वेगळे स्थान निर्माण केले होते. धनुष आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे एकूण 180 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

आनंद एल राय यांचा 'रांझना' जून 2013 मध्ये रिलीज झाला होता. धनुषने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जेव्हा चित्रपटाचा फर्स्ट लूक, पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला तेव्हा धनुषला त्याच्या लूकमुळे हिंदी प्रेक्षकांनी खूप ट्रोल केले होते. मात्र, जसजसा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळ आला आणि त्याच्या उर्वरित क्लिप बाहेर आल्या, तसतशी धनुषची जादू दिसू लागली. त्याचबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक धनुषचे चाहते झाले. रांझना व्यतिरिक्त धनुषने 'शमिताभ' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटातही प्रेक्षकांची मने जिंकली. धनुष सध्या त्याच्या 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये धनुषचे 'कोलावेरी दी' हे गाणे खूप गाजले आणि या गाण्यामुळे त्याती एक वेगळीच क्रेझ चाहत्यांन मध्ये पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

4 राष्ट्रीय पुरस्कार आणि वैयक्तिक जीवन

गेल्या वर्षी मार्चमध्ये धनुषने 'असुरन' या चित्रपटासाठी चौथा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. धनुषने आतापर्यंत एकूण 4 'राष्ट्रीय चित्रपट' पुरस्कार जिंकले आहेत. 2010 मध्ये पहिल्यांदाच धनुषला 'आदुकलम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर 2014 आणि 2015 मध्ये सह-निर्माता म्हणून तो राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत पोहोचला. धनुषच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत झाले होते. पण 2022 च्या जानेवारीमध्ये या जोडप्याने विभक्त होण्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. ऐश्वर्या आणि धनुषने 18 वर्षे जुने नाते तोडले. (हे देखील वाचा: Telugu Cinema Withold Shooting: तेलगु निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, 1 ऑगस्टपासून कोणत्याही तेलगू चित्रपटाचे शूटिंग होणार नाही)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुषचे आगामी चित्रपट

धनुषचे चाहते खूप उत्सुक आहेत कारण वाढदिवसानिमित्त धनुष आपल्या चाहत्यांना नक्कीच काय तरी गिफ्ट देणार. दरम्यान धनुषच्या आगामी चित्रपटांच्या आगामी खात्यात 'नाना वरुवें'चे नाव जोडले गेले आहे. नाने वारुवेंच्या पोस्टरसोबतच ‘सर’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या दोन चित्रपटांशिवाय धनुषच्या खात्यात 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाचा समावेश आहे, काही दिवसापुर्वी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला होता. 'कॅप्टन मिलर'चे दिग्दर्शन अरुण माथेश्‍वरन करणार आहेत तर 'सर' या चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकी अटलुरी करणार आहेत.