Coronavirus: बॉलिवुड निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Karim Morani's daughter Shaza Morani (PC - Instagram)

Coronavirus: बॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्माता करीम मोरानी (Karim Morani's) यांची मुलगी शाजा मोरानी (Shaza Morani) हिची कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. शाजावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करीम मोरानी हे मुंबईतील जुहू भागात राहतात. शाजाला कोरोनाची लागण झाल्याने मोरानी यांचे घर महानगरपालिकेकडून सील करण्यात येणार आहे. मोरानी यांच्या घरात एकूण 9 लोक राहतात. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

करीम मोरानी हे बॉलिवुडमधील प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी शारुखानच्या 'रावन' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' सारख्या चित्रपटांची निर्माती केली आहे. चित्रपटसृष्टीत करीम आणि शाहरुखचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. मुलगी शाजाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने करीम मोरानी यांना धक्का बसला आहे. सध्या शाजावर उपचार सुरू आहेत. तसेच तिच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus: गायिका कनिका कपूर हिला डिस्चार्ज, अखेर सहावी कोरोना व्हायरस चाचणी आली निगेटीव्ह)

दरम्यान, भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या 4 हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. यात मोठ्या प्रमाणात मुंबईतील रुग्णांचा समावेश आहे. तब्बल 350 पेक्षा जास्त रुग्ण केवळ एकट्या मुंबईमध्ये आढळून आले आहेत. आज महाराष्ट्रात कोरोनाची 33 नवे प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 781 इतकी झाली आहे.