Preity Zinta And Sonam Kapoor (Photo Credits: Instagram)

दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर शेतक-यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन (Farmers Protest) छेडले आहे. कृषि कायद्याविरोधात (Farm Bills) सलग 11 दिवस हे आंदोलन सुरु असून यावर अजून सरकारने योग्य तो तोडगा काढलेला नाही. यामुळे उद्या म्हणजेच 8 डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक पुकारली आहे. दरम्यान शेतक-यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यात आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रीति जिंटा Preity Zinta आणि सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेत्री प्रीति झिंटाने ट्विटच्या माध्यमातून शेतक-यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. "इतक्या थंडीतही हे शेतकरी आंदोलनास बसले आहेत. ते आपल्या मातीचे सैनिक आहेत जे आपल्या धान्याने आपला देश चालवतात. मला आशा आहे की शेतकरी आणि सरकार यांच्या झालेल्या चर्चेतून चांगले परिणाम समोर येतील आणि शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागतील" असे ट्विट प्रीतिने केले आहे.

तर फॅशन आयकॉन सोनम कपूर हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात तिने डॅनियल वेबस्टरच्या सुंदर ओळी लिहत म्हटले आहे की, "जो पर्यंत सुरु हेोतं, इतर कला सुरु राहतात. म्हणूनच शेतकरी मानव सभ्यताचे संस्थापक आहेत".हेदेखील वाचा- Farmers Protest: दिलजीत दोसांझची आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटीची मदत; खरेदी केले जातील गरम कपडे आणि ब्लँकेट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांचे अनेक सेलेब्ज शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. रितेश देशमुख, सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू, सोनम कपूर यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत.

दरम्यान, सध्या शेतकरी चळवळ हा देशातील सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. शेतकर्‍यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि राष्ट्रीय राजधानीत येणारे आणखी मार्ग अडविण्यात येतील असा इशारा दिला आहे.