बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने मालदीवच्या किनाऱ्यावरील टॉपलेस फोटो केले शेअर; पहा बोल्ड फोटोज
Mouni Roy Shared Topless Photos (PC- Instagram)

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'गोल्ड' (Gold) सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या मालदीवच्या किनाऱ्यावर (Maldives Coast) सुट्टी एन्जॉय करत आहे. मौनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. यात मौनी खूपच बोल्ड दिसत आहे. सध्या मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या फोटोत मौनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने 'मी हे पुस्तक सहजच उघडलं', अशी कॅप्शनही दिली आहे. मौनी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले बोल्ड आणि हॉट फोटो ती नेहमी शेअर करत असते. यापूर्वी तिने अनेकदा आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत. फोटोमधील तिच्या या मादक अदांमुळे मौनीच्या चाहत्यांनी तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. (हेही वाचा - 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री)

 

View this post on Instagram

 

This is important!!! @heritanceaarah @globalspa_mag #mindblown

A post shared by mon (@imouniroy) on

 

View this post on Instagram

 

... @heritanceaarah @Globalspa_mag

A post shared by mon (@imouniroy) on

मौनीने रॉयने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर सुपरस्टार अक्षय कुमारसोबत गोल्ड चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येणं चालू झालं आहे. 'मेड इन चाइना' या चित्रपटात मौनी रॉय मुख्य भूमिकेत झळकणार होती. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसला होता. हा चित्रपट मागील वर्षी 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. आता मौनी दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.