
Jacqueline Fernandez Dance In Blue Saree: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. लॉकडाऊनमध्ये जॅकलीनने आपल्या चाहत्यांसाठी विविध योगासनाचे व्हिडिओ शेअर केले होते. सध्या सोशल मीडियावर जॅकलीनचा निळ्या रंगाच्या साडीतील एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. जॅकलिनचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिन ‘गेंदा फूल’ गाण्यावर थीरकताना दिसत आहे. या व्हिडिओला जॅकलिनच्या चाहत्यांनी लाईक्स तसेच कमेन्टस दिल्या आहेत. जॅकलिनचा हा व्हिडिओ 'डान्सिंग फिव्हर' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या डान्स व्हिडिओमध्ये जॅकलीन निळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर आणि क्युट दिसत आहे. तिच्या या लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलीनसोबत इतर डान्सर्सही नृत्य करताना दिसत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 48 हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. (हेही वाचा - Sawan Mein Lag Gayi Aag Song: विक्रांत मेसी आणि यामी गौतम चा चित्रपट 'गिन्नी वेड्स सनी' मधील पार्टी साँग प्रदर्शित, मिका, बादशाह आणि नेहा कक्कड़ ची जबरदस्त जुगलबंदी)
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला जॅकलिनच्या शूट क्रूमधील दोन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. परंतु, जॅकलिनची कोरोना चाचणी नेगेटीव्ह आली होती. यासंदर्भात जॅकलिनने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली होती.
जॅकलिनचा अभिनयाशिवाय सामाजसेवा करण्यावरदेखील जास्त भर आहे. त्यामुळे तिने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे, पाथर्डी आणि सकुर दत्तक घेतली आहेत. जॅकलिन या गावातील कुपोषित लोकांना जेवण पुरवणार आहे. यासाठी जॅकलिनने 'अॅक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन'सोबत करार केला आहे. तिच्या या सामाजिक कार्याचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.