Kamal Rashid Khan (PC - Facebook)

KRK Arrested: केआरके म्हणजेच कमाल रशीद खान (Kamal Rashid Khan) बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीचं चर्चेत असतो. स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेला पोलिसांनी अटक केली आहे. केआरकेला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. कमालच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले होते.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, 'कमाल रशीद खानला 2020 मध्ये मालाड पोलिसांनी त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी अटक केली होती. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला आज बोरिवली कोर्टात हजर केले जाणार, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Ranveer Singh Case: न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा नोंदवला जबाब)

केआरके वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो आपल्या ट्विटमुळे अनेकवेळा वादात सापडला आहे. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. कमाल नेहमीच बॉलीवूड आणि अनेक बड्या स्टार्सना टार्गेट करत असतो. या यादीत सलमान खानपासून अनेक बड्या स्टार्सचा समावेश आहे.

Liger चित्रपटासंदर्भात केलं ट्विट -

नुकतेच KRK ने विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा चित्रपट Liger बद्दल ट्विट केले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, 'भाऊ करण जोहर, मी तुझा Liger चित्रपट पाहण्यासाठी एक हजार रुपये खर्च केले आणि त्या बदल्यात मला यातना मिळाल्या. भाऊ तुम्ही मला माझे पैसे परत देऊ शकता का? माझे पैसे पाठवा किंवा खात्यात जमा करा. धन्यवाद.'