बॉलिवूडमध्ये आजही असे अभिनेते आहेत, जे त्यांच्या साधेपणामुळे नेहमी आपल्या चाहत्यांची मनं जिकंत असतात. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) ने घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजताचं मावळ (Maval) येथे जाऊन तिच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं. अगदी साध्या पद्धतीने जॅकी श्रॉफ याठिकाणी पोहोचला होता. त्याच्या या अंदाजाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, आपल्याकडे घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजताचं जॅकी श्रॉफ यांनी थेट मावळ गाठलं. त्यांनी मावळमधील पवनानगर येथे जाऊन तरुणीच्या कुटुंबियांना सांत्वन करत धीर दिला. दीपाली तुपे असं या तरुणीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी दीपालीच्या आजीचं वृद्धापकाळानं निधन झालं. ही बातमी समजल्यानंतर जॅकी दीपाली आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी त्यांच्या मावळ येथील घरी पोहोचला. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफचा या भेटीदरम्यानचा फोटो व्हायरल होत आहे. (वाचा - Radhe Poster Out: प्रतिक्षा संपली! सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज)
जॅकीच्या या अचानक भेटीमुळे ठाकर कुटुंब भारावून गेले. यावेळी जॅकीने दीपालीच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यापूर्वीदेखील जॅकी यांच्या साधेपणाचा प्रत्यय त्यांच्या चाहत्यांना आला आहे. दरम्यान, जॅकी श्रॉफने चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावले आहे. त्याने एकापेक्षा जास्त चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, जॅकी श्रॉफ आपल्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतो. जॅकी आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो. जॅकी आपल्या सोशल मीडिया अकाऊटवरून मुलगा टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णासोबतचे फोटो शेअर करत असतो. अलीकडे जॅकीची पत्नी आयशा आणि मुलांनी त्याच्यासाठी एक खास संदेश दिला. हा संदेश ऐकल्यानंतर जॅकीचे डोळे भरून आले.
जॅकी श्रॉफ सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल 12' च्या मंचावर पोहोचले. येथे जॅकीने स्पर्धकांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले आणि खूप मजा केली. स्पर्धकांची कामगिरी संपल्यानंतर जॅकीला एक व्हिडिओ दाखविण्यात आला. या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी आयशा, मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णाने त्याच्यासाठी खास संदेश दिला. हा संदेश ऐकून जॅकीच्या डोळ्यात अश्रू तरळले.