काळवीट शिकार प्रकरणी सैफ, तब्बू, सोनाली, नीलम आणि दुष्यंत सिंह यांना राजस्थान हायकोर्टाने धाडली नोटिस
सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

जोधपूर येथे काळवीट शिकार (Blackbuck Poaching) केल्याप्रकरणी बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आणि दुष्यंत सिंह यांना राजस्थान हायकोर्टाने (Rajashtan High Court) पुन्हा एकदा नोटिस धाडली आहे. ही नोटिस 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणी सीजीएम द्वारे निर्दोष सुटका झाल्याच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व कलाकारांना कोर्टात सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी 8 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. तर सीजीएम ग्रामीण कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी या सर्व कलाकारांची निर्दोष सुटका केली होती. मात्र आता राज्य सरकारकडून राज्यस्थान हायकोर्टात याविरुद्ध अपील केले. यावर न्या. मनोज गर्ग यांनी कोर्टात सुनावणी केली होती. (काळवीट शिकार प्रकरण: सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह अन्य कलाकारांना जोधपुर हायकोर्टाने 'या' कारणामुळे धाडली नोटीस)

तर 1998 मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगवेळी असा आरोप लावला गेला होता की, काकानी गावात मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी जवळजवळ 20 वर्ष सुनावणी होत आहे.