महाराष्ट्रात 'तानाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याची भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची मागणी
Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी- द अनसंग वॉरिअर' नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशात तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली आहे.सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तानाजी चित्रपट हा त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत अभिनेता अजय देवगण याने सुद्धा तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी विनंती सरकारला केली होती.

महाराष्ट्रात भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली आहे. तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार असून त्यांची 1670 मधील सिंहगडावर केलेल्या कामगिरीचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवला जातो त्यामुळेच हा चित्रपट टॅक्स फ्री असावा.(Tanhaji Trailer: अजय देवगण, सैफ अली खान यांच्या दिमाखदार अंदाजातील 'तानाजी' सिनेमाचा ट्रेलर आऊट; पहा मुघलांच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक करणारी लढाई (Watch Video)

तनाजी सिनेमाची कथेसह त्यांची स्टार कास्ट सुद्धा तितकीच तगडी आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान या तिन्ही कलाकारांनी अगदी उत्तम काम केलं असल्याचं समीक्षकांचं तसेच प्रेक्षकांचं मत आहे. तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. सिनेमामध्ये 17 व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर मांडण्यात आला आहे. हा सिनेमा 3 डी माध्यमातूनही रीलीज करण्यात आला आहे.