Saif Ali Khan | (Photo credit: archived, edited, representative image)

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान (Saif Ali Khan) वरील चाकूहल्ला प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 17 जानेवारी रोजी बॉलीवूड अभिनेत्यावर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी घुसखोराने हल्ला केला होता. नंतर त्याला 6 जखमा झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक शस्त्रक्रिया केल्यानंतर अभिनेता सध्या आयसीयूमध्ये आहे. दुसरीकडे, सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटवण्यात आलेल्या संशयित आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिस अथक प्रयत्न करत आहेत.

आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग येथे रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. तो बिलासपूरला जात होता. त्याचे नाव आकाश कैलाश कन्नौजिया असून तो 31 वर्षांचा आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे फास्टट्रॅक असे लिहिलेले एक बॅकपॅक देखील सापडले आहे. सैफच्या इमारतीतील आणि दादरच्या मोबाईल शॉपमधील सीसीटीव्हीमध्ये असाच एक बॅकपॅक दिसला होता. (हेही वाचा - Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरणी तपासाला वेग; मध्य प्रदेशातून एक संशयित ताब्यात)

आरपीएफ दुर्गच्या अधिकाऱ्यांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यासाठी मुंबईला आणण्यात येत आहे. तो ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करत होता. मुंबई पोलिसांना मोबाईल लोकेशनची माहिती मिळाली होती, ज्याच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो हल्लेखोर आहे की नाही याची चौकशी केली जाईल. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 15 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या घरातील कर्मचारी आणि नोकरांचा समावेश आहे.